सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

थोर शास्त्रज्ञ

 एडमंड हॅले   


जन्म 8 नोव्हेंबर 1656

मृत्यू 14 जानेवारी 1742


धूमकेतूबरोबर नाव जोडले गेलेले जगातील पहिले श्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणजे एडमंड हॅले. धूमकेतूबद्दलचे गैरसमज दूर करणे, भरती-ओहोटीबद्दल वस्तुनिष्ठोधन करणे, निसर्गातील अद्भुत सत्य लोकांसमोर मांडणे या गोष्टी हॅलेने आयुष्यभर केल्या. दहा 5 यर्षांनंतर दिसणाऱ्या हॅले या धूमकेतूचे संशोधन करण्याचा मान याच शास्त्रज्ञाकडे जातो. 1682 मध्ये हा धूमकेतू त्यांनी पहिल्यांदा पाहिल्यावर हॅले यांनी त्याचा सखोल अभ्यास केला. लोकांमधील अंधविश्वास दूर करून या धूमकेतुच्या शोधासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी या धतुला हॅलेचा भूमकेतू म्हणतात. असा सन्मान आयुष्यात क्वचितच मिळतो.


हॅले यांचा जन्म इंग्लंडमधील लंडन या राजधानीच्या शहराजवळील हॅगरस्टन शोरोडीच गावी झाला. तो आई-वडिलांचा सर्वांत ज्येष्ठ पुत्र होता. संशोधनाचे बाळकडू त्याला वडिलांकडून मिळाले. त्याचे वडील साबणाचे कारखानदार होते. त्यांनी आपल्या मुलातील संशोधन वृत्तीला चालना दिली. पहिली काही वर्ष एडमंडसाठी घरीच शिक्षणाची सोय त्याच्या वडिलांनी केली. सेंट पॉल स्कूलमधील त्याचे दिवस आनंददायी होते. तेथे तो ग्रीक, लॅटिन, हिब्रू शिकला. गणिताची गोडी त्याला शाळकरी वयातच लागली आणि ती गोडी आयुष्यभर टिकली व वाढली. एके दिवशी वडिलांनी खुशीत येऊन त्याला अवकाश निरीक्षण करण्याची साधने दुर्बीण भेट दिली. या सगळ्या वस्तू कशा वापरायच्या हे शिकवले. मग काय, या विषयाची • आयुष्यभरासाठी संगत झाली. तो ऑक्सफर्डला शिक्षणासाठी गेल्यावर या विषयाची गोडी अधिकच वाढली. हॅलेच्या कित्येक रात्री अवकाश निरीक्षणात जाऊ लागल्या. सुट्टीच्या काळात तर दिवसरात्र तहानभूक विसरून तो अवकाश निरीक्षण करत असे. यातूनच त्याने खगोलीय गणिताचा अभ्यास केला. त्यावर शोधनिबंध लिहायला सुरुवात केली. रॉयल सोसायटीने शोधनिबंध प्रसिद्ध केल्यावर त्याला जगण्याची दिशा सापडली. वयाच्या 16 व्या वर्षीच या मुलाचा निश्चय झाला, की आपण खगोलशास्त्रज्ञ व्हायचे. त्याने विसाव्या वर्षी त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने दक्षिण गोलार्धातील 341 तारकांची सूची तयार केली. वयाच्या 22 व्या वर्षी त्याची रॉयले सोसायटी ऑफ लंडनचा सभासद म्हणून निवड झाली.


वडिलांनी मुलाच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घातले. सेंट हॅलेना बेटावर जाण्यासाठी त्याच्या खर्चाची तरतूद केली. याच मुक्कामात त्याने तोऱ्यांचा नकाशा तयार केला. धूमकेतू हे सूर्यमालेचे घटक असतात आणि ते सूर्याभोवती भ्रमण करतात ही गोष्ट हॅलेने सिद्ध केली.


सन 1686 मध्ये यांनी प्रथम पृथ्वीवरील वाऱ्याची दिशा दर्शवणारा नकाशा तयार केला. हॅले यांनीच प्रथम नद्यांच्या प्रवाहातून येणाऱ्या क्षारांमुळे समुद्राचे पाणी खारट होते हे सांगितले. पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्राचे परिवर्तन, पृथ्वीच्या वयाचा अंदाज इत्यादींवर संशोधन केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गोड आठवणी

माझ्या चिमुकल्या कन्या